नोकारी (पाल) येथे युवकांकडून ग्रामस्वच्छता

0
158

By : Mohan Bharti

कोरपना – तालुक्यातील नोकारी येथील युवकांकडून गटारांची स्वच्छता करून नेहमी ग्रामस्वच्छता करण्यात येते. तरुण युवकांनी ग्रामस्वच्छतेचा वसा हातात घेतला असून गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या युवकांनी गावातील संपूर्ण गटारे लोकसहभागातून पूर्णपणे साफ केले असून यामुळे ग्रामपंचायतच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. गटाराच्या स्वच्छतेमुळे ग्रामपंचायतची जवळपास ५० हजार रुपयांची बचत झाली असून ती रक्कम लोकांच्या आरोग्यावर खर्च करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्वच्छता करणारे युवक सोमा कुळमेथे, रंजन प्रधान, सुरज कन्नाके, लक्ष्मण कन्नाके, गणेश मंडाळी, धनराज सोयाम, विलास मडावी, सुरज मडावी, झित्रु मडावी, विकास कोरांगे, कृतिक कन्नूरवार यांनी ग्रामपंचायतकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here