नितीनजी गडकरी यांनी केलेले सहकार्य लाख मोलाचे – आ. सुधीर मुनगंटीवार*

0
66


By Shivaji selokar
*डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समिती चंद्रपूरला रुग्‍णवाहीका सुपुर्द*

कोरोनाच्‍या या लढाईत व्‍हेंटीलेटर, ऑक्‍सीजन, कॉन्‍स्‍ट्रेटर आदी उपकरणांसाठी आमचे नेते मा.श्री. नितीनजी गडकरी यांनी सहकार्याचा हात दिला व त्‍या माध्‍यमातुन आम्‍ही नागरिकांना सेवा देवु शकलो. डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समिती चंद्रपूर या सेवाभावी संस्‍थेला रुग्‍णवाहिका भेट देवुन मा. नितीनजींनी पुन्‍हा एकदा या जिल्‍हयातील वनवासी व दुर्गम भागात उपलब्‍ध होणा-या आरोग्‍य सेवेला सहकार्य केले आहे. आम्‍ही या लोकनेत्‍याचे कायम आभारी राहु, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दि. १९ मे रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरातील आश्रय बालकाश्रमात डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समिती चंद्रपूर या संस्‍थेला रुग्‍णवाहीकेची चावी सुपुर्द केली. सदर रुग्‍णवाहिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या माध्‍यमातुन उपलब्‍ध करण्‍यात आली आहे.
यावेळी डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समिती चंद्रपूरचे अध्‍यक्ष वसंतराव थोटे, सचिव आशिष धर्मपूरीवार, संदीप बच्‍चुवार, प्रांत धर्मनागरण प्रमुख महेंद्र रायचुरा, संघाचे जिल्‍हा कार्यवाही शैलेश पर्वते, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्‍थायी समितीचे सभापती रवी आसवानी यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समिती चंद्रपूरच्‍या माध्‍यमातुन १८ बेडेड कोविड केअर सेंटरला आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली व पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here