लोकदर्शन गडचांदूर 👉 मोहन भारती
गडचांदूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गडचांदूर येथे आमदार देवराव भोंगळे यांनी अभिवादन अर्पण केले. यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये नगरपरिषद गटनेते सतीश भाऊ बेतावार, तालुका महामंत्री सतीशभाऊ उपलंचीवार, व्यापारी आघाडीचे विश्वनाथ झाम, शहराध्यक्ष अरुण भाऊ डोहे, विकी उरकुडे, रोहणे भोंगळे, मोहन भारती, नगरसेविका कीर्ती वैरागडे यांच्यासह नगरसेवक मेश्राम सर, शहर महामंत्री हरीश भाऊ घोरे, गणेश गुरनुले आदींचा समावेश होता.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या कार्याला अभिवादन केले. तसेच आमदार भोंगळे यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी प्रस्तावित जागेची पाहणीही केली.





