लोकदर्शन राजुरा 👉मोहन भारती
राजुरा : पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान-२०२६ अंतर्गत राजुरा ग्रामीण मंडळाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे उद्घाटन काल (दि. ७) सेलेब्रेशन हॉल येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.
या कार्यशाळेचा उद्देश भाजपची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे तसेच सेवाभावी दृष्टिकोन अधिक दृढ करणे हा आहे. कार्यकर्त्यांना संघटन बांधणी, केंद्र व राज्य शासनाच्या लोकाभिमुख योजनांची माहिती आणि विविध राजकीय कौशल्ये आत्मसात करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरत आहे.
यावेळी कार्यकर्त्यांनी या निवासी कार्यशाळेत पूर्णवेळ सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. प्रशिक्षण महाअभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना नवे ज्ञान आणि दिशा मिळत असल्याचेही नमूद करण्यात आले.
प्रसंगी एसआयआर अभियान प्रमुख सतीश उपलेंचवार, समीर केणे, अमित गुंडावार आणि यश बांगडे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांना प्रेरित केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुकाध्यक्ष वामन तुराणकर, शहराध्यक्ष सुरेश रागीट, महामंत्री दिलीप गिरसावळे, हरिदास झाडे, सचिन बल्की, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा पौर्णिमा उरकुडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष अजय राठोड, चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर, यशोधरा निरांजने, रेश्मा चव्हाण, गौरी सोनेकर यांच्यासह राजुरा तालुक्यातील अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





