By : Shankar Tadas
कोरपना : तालुक्यातील चनई खुर्द येथील विदर्भ जिनिंगमध्ये कापसाच्या ढिगात मजुराचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना रविवार, २८ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता उघडकीस आली. संतोष मरावी (२८) रा. बाजक जिल्हा दिंडोरी (मध्य प्रदेश) असे मृतकाचे मजुराचे नाव आहे.
संतोष मरावी हा चनई खुर्द येथील विदर्भ जिनिंग मध्ये कामासाठी आला होता.गेल्या दोन महिन्यापासून जिनिंगमधील असेल्या खोलीमध्ये पत्नी व लहान मुलासोबत राहत होता. गेल्या तीन ते चार दिवसापासून बेपत्ता होता. त्याचा सर्वत्र शोधा घेतला. या बाबत चार दिवसा अगोदर पोलीस स्टेशन कोरपणा येथे त्याच्या पत्नीने माहिती दिली परंतु तो मिळाला नाही. याच दरम्यान रविवारी कापसाच्या जिनिंगमध्ये गंजी उतरवत असताना दुर्गंधी येत होती. सदर मृतदेह हा सहा सात दिवसापूर्वीचा असल्याचे म्हणले जात आहे. या बाबतची माहिती कोरपणा पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक देवानंद केकण व पो.ह.प्रभाकर जाधव, पो.ना. किशोर रिंगोले यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालंय कोरपणा येथे आणला. शव विच्छेदन करण्यात आले. सदर घटनेमुळे जिनिंग मध्ये काम करणाऱ्या कामगारामध्ये भीती चे वातावरन निर्माण झाले आहे. जिनींग कामगारांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण होत आहे.जिनिंग मध्ये दररोज किती मजूर कामावर आहे याची नोंद जिनिंग प्रशासनाकडे असणे अनिवार्य आहे. सहा सात दिवस जिनिंग मधील मजूर बेपत्ता असतो त्याची माहिती जिनिंग मालकाने पोलीस स्टेनशला देणे आवश्यक होते. मात्र या घटनेत तसे झाले नाही. त्यामुळे या सर्व घटनेत जिनिंग प्रशासनाचा निष्काजीपणा असल्याचे बोलले जात आहे. पोलीस विभागाने सखोल चौकशी करून समंधितावर सदोष मनुष्य वधाचा गुन्ह दाखल करण्याचे बोलले जात आहे. मृतकाच्या कुटुंबियांना जिनिंग मालकाकडून आर्थिक मदतीची मागणी होत आहे . शव विच्छेदन करून शव मृतकाच्या नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करून पुढील तपास ठाणेदार वाढीवे मॅडम यांच्या मार्गदशनात कोरपणा पोलीस करित आहे. मृतकाच्या मागे पत्नी , एक मुलगा असा परिवार आहे.





