Home
Home गडचांदूर / कोरपणा गडचांदूरमध्ये युवांचा काँग्रेसकडे कल : निवडणुकीत आघाडीला बळ

गडचांदूरमध्ये युवांचा काँग्रेसकडे कल : निवडणुकीत आघाडीला बळ

लोकदर्शन 👉मोहन भारती

गडचांदूर : गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला स्थानिक पातळीवर तरुण कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाल्याचे समोर आले आहे. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात गोंडवाना पक्षाचे महेश परचाके तसेच भाजप आणि गोंडवाना गणतंत्र पक्षाशी संबंधित असलेल्या अनेक युवक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी काँग्रेस–शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)–वंचित बहुजन आघाडी आणि जनविकास गोंडवाना पक्ष या आघाडीतील “नगर विकास आघाडी”चे स्थानिक नेतृत्वही उपस्थित होते.

काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांमध्ये संदीप परचाके, सुनील सिडाम, विजय गेडाम, राहुल टेकाम, गणेश कुमरे, राजेंद्र सिडाम, आकाश परचाके, राजाराम परचाके, शुभम आत्राम, सुरेश सिडाम, अनंता सिडाम, आकाश मडावी, प्रफुल्ल कोटनाके, शंकर परचाके, अनिल सातपुते आणि अनिकेत कोटावार यांचा समावेश आहे. तर भाजपमधून राकेश सुरकर, अभिनव दुबे, प्रसाद सुरनार, भास्कर पोले, क्षितिज गोरगरे, अभिषेक सुरनार, साईप्रसाद येमुलवार, प्रवीण चौधरी, रामासर केवट, तरोउत्तम केवट, जितेश देवकते आणि शितूजल केवट यांच्यासह काही युवकांनीही प्रवेश केला.

कार्यक्रमात काँग्रेस–शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)–वंचित बहुजन आघाडी आणि जनविकास गोंडवाना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सचिन भोयर आघाडीचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तम पेचे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे, बाळासाहेब मोहितकर, विठ्ठल थिपे, सागर ठाकूरवार, विजय ठाकूरवार, दिव्यकुमार बोरकर, मधुकर चुनारकर आणि आघाडीतील उमेदवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष महाडोळे यांनी केले.

या प्रवेशानंतर गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे स्थान अधिक मजबूत झाल्याचे स्थानिक पातळीवर राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here