By : Shankar Tadas
गडचांदूर : खरीप हंगामाला प्रारंभ झालेला असून सोयाबीन आणि कापूस उत्पादन अधिक प्राप्त करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन खिर्डी येथे आयोजित कार्यक्रमात तालुका कृषी विभाग, अंबुजा फाउंडेशन,उत्तम कापूस यांच्या वतीने करण्यात आले. परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरणदिन 5 जून रोजी खिर्डी येथे खरीप हंगाम पूर्व कार्यक्रम अंतर्गत मा. जी डी ठाकूर साहेब तालुका कृषी अधिकारी कोरपना यांनी सोयाबीन पिकाचे उगवन क्षमता तपासणी , बीज प्रक्रिया, सोयाबीन पिकाची अश्ट्सुत्री , सोयाबीन पिकाची बी बी एफ वर लागवड , भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, मग्रारोहयो, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, महा डीबिटी, वरील विविध योजना, पॅक हाऊस या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. अंबुजा फाउंडेशन चे श्री विशाल भोगावार पी ओ मॅनेजर यांनीही उत्तम कापूस प्रकल्प अंतर्गत कापूस पिकाचे सखोल मार्गदर्शन केले.खिर्डीचे उपसरपंच दीपक खेकारे, ग्रामपंचायत सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. पत्रकार शंकर तडस यांनी शेतकऱ्यांपुढील प्रश्न आणि उपाययोजना याबद्दल मनोगत व्यक्त केले. तालुक्यातील बोरी नवेगाव येथील निवेदिता महिला बचत गटाने तयार केलेल्या चिकट सापळ्याचा शेतकऱ्यांनी वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. पर्यावरणदिनानिमित्त विद्यार्थ्यांचे चित्रकला प्रदर्शन लावण्यात आले होते.
उपस्थित बीसीआय चे कर्मचारी श्री सिडाम, अर्विन बावणे, श्री उपरे, श्री पेंदोर सर , किशोर शेंडे, आशिष रागीट, बी एल तिडके कृषि सहाय्यक यांनी कार्यक्रम आयोजनाकरिता विशेष सहकार्य केले.





