विदर्भ स्तरीय आमदार चषकाचा शानदार समारोप. ♦️पुरूष गटातून विद्युत मोहाडी तर महिला गटातून रविंद्र उमरेड संघ प्रथम पुरस्काराचे मानकरी. ♦️आकाश पिकलमुंडे, प्राची बघेल ठरले प्लेअर आफ द टूर्नामेंट.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या संकल्पनेतून राजुरा कल्ब राजुरा द्वारा महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय राजुराच्या पटांगणावर आयोजित तीन दिवसीय विदर्भस्तरीय आमदार चषक कबड्डीचे स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. काल शेवटच्या दिवशी स्पर्धेचे बक्षीस वितरण शानदार सोहळ्यात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे होते, प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, चंद्रपूर जिल्हा कबड्डी महासंघाचे पदाधिकारी सुभाष गौर, दिलीप रामेडवार, कुणाल चहारे, सेवा कलस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजित धोटे, सचिव शंतनु धोटे यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
पुरूष गटातून विद्युत मोहाडी तर महिला गटातून रविंद्र उमरेड संघ प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले. विद्युत मोहाडी संघाला प्रथम पुरस्कार ७१ हजार रुपये रोख व चषक, स्वर्गीय रामचंद्रराव धोटे माजी आमदार यांच्या स्मृती प्रित्यर्थ आमदार सुभाष धोटे यांच्यातर्फे तर द्वितीय पुरस्कार एकलव्य नागपूर च्या संघाला ५१ हजार रुपये रोख व चषक, स्वर्गीय सुधाकरराव देशपांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुनील देशपांडे यांच्यातर्फे देऊन गौरविण्यात आले. महिला गटात रविंद्र क्रीडा मंडळ, उमरेड संघाला प्रथम पुरस्कार ५१ हजार रुपये रोख व चषक, स्वर्गीय प्रभाकरराव मामुलकर माजी आमदार यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रीमती सुमनताई मामुलकर यांच्यातर्फे तर द्वितीय पुरस्कार साई क्रीडा मंडळ काटोल च्या संघाला ३१ हजार रुपये रोख व चषक, श्रीमती मालतीबाई धोटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्यातर्फे देऊन गौरविण्यात आले. तसेच पुरूष गटातून प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ११ हजार रुपये – विद्युत मोहाडी संघाचे आकाश पिकलमुंडे, प्लेअर आफ द मॅच, ७ हजार रुपये – एकलव्य नागपूर संघाचे वंश मुदलीवार, उत्कृष्ट पकड ७ हजार रुपये- विद्युत मोहाडी चे अनिकेत गभणे, उत्कृष्ट चढाई ७ हजार रुपये – एकलव्य चे सारंग देशमुख, तर महिला गटातून प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ११ हजार रुपये – रविंद्र उमरेड ची प्राची बघेल, प्लेअर आफ द मॅच, ७ हजार रुपये – साई काटोल ची तनु ठाकरे, उत्कृष्ट पकड ७ हजार रुपये- साई काटोल ची मुस्कान लोखंडे, उत्कृष्ट चढाई ७ हजार रुपये – रविंद्र उमरेड ची हर्षा खडसे यांना देण्यात आले. तर अनेक सामान्यात विविध वैयक्तीक पुरस्कार देण्यात आले.
तीन दिवस चाललेल्या कबड्डी स्पर्धांचे बहारदार संचालन छोटुलाल सोमलकर, एजाज अहमद, प्रा. प्रफुल्ल शेंडे, प्रलय मशाखेत्री यांनी केले. कार्यक्रमाला दहा हजार पेक्षा जास्त संख्येने राजुरा व परिसरातील क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इर्षाद शेख, प्रणय लांडे, अशोक राव, आकाश मावलीकर, रामेश्वर ढवस, रतन पचारे, मोहंमद वकील, शुभम खेडकर, राहुल बेतावार, निरंजन मंडल, राकेश बेतावार, मारोती रोहणे व टिम, वैभव बोरकुटे व टिम तसेच वेकोली कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे यशस्वी आयोजन राजुरा कल्ब, सेवा कलश फाउंडेशन, इन्फंट जीजस सोसायटी, कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंग, राईस अकॅडमी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here