आमदार सुभाष धोटे यांनी साजरी केली आदिवासी बांधवांसोबत दिवाळी.

लोकदर्शन 👉मोहन भारती

कोरपना :– राजुरा विधानसभा क्षेत्रात आदिवासी बांधवांची संख्या मोठी असून येथे आदिवासी बांधव अनंत वर्षांपासून दिवाळी सनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पारंपरिक आदिवासी संस्कृतीला अनुसरून मोठय़ा आनंदाने, उत्साहाने आणि प्रामाणिकपणाने दिवाळी उत्सव साजरा करीत असतात. या उत्सवातून आदिवासी लोकसंस्कृतीचे दर्शन होत असते. त्यामुळेच लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी कोरपना तालुक्यातील निजमगोंदी, रामपूर, बेलगांव येथील आदिवासी बांधवांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थित राहुन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. आमदार सुभाष धोटे यांचे या क्षेत्रातील आदिवासी बांधवांसोबत पिढ्यानपिढ्या पासूनचे स्नेहसंबंध आहे. ते नेहमीच आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करीत असतात. याही वर्षी ही परंपरा कायम ठेवत आदिवासी बांधवांच्या पाड्यावर भेटी देऊन त्यांच्यासोबत त्यांनी दिवाळी साजरी केली. तसेच आपले मुळगाव खिर्डी येथेही उपस्थित राहून दिवाळी साजरी केली.
या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर धोटे, माजी जि. प. सदस्य सिताराम कोडापे, शुभाकांत शेरकी, सुदर्शन डवरे, प्रदीप मालेकर, अशोक आस्कर, चिनु पा. येडमे, संभा पा. सायकाटी, गुलाब जीवतोडे, कैलास मेश्राम, विठ्ठल खारकर, शामकांत निकाडे, लिंगु सायकाटी, शामसुंदर पेंदोर, विकास सायकाटी यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक आदिवासी बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here