उरण वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय पवार राष्ट्रपती पदकाने सन्मानित.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

 

उरण दि १४ ऑक्टोंबर
दि. १३/१०/२०२२ रोजी दरबार हॅाल,राजभवन मुंबई येथे महाराष्ट्र पोलीस दलातील ११४ पोलीस अधिकारी/ अंमलदारांना २०२०/२०२१ चे राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याने मा. राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांचे हस्ते व मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत पोलीस अधिकारी/ अंमलदारांना सन्मानित करण्यात आले.यावेळी मा. पोलीस महासंचालक रजनिश सेठ,पो आयुक्त विवेक फनसाळकर,मुख्य सचीव आनंद लिमये व इतर मान्यवर उपस्थित होते.
संजय पवार, पोलीस उपनिरीक्षक उरण वाहतुक शाखा यांना यावेळी राष्ट्रपती पदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.उत्कृष्ट जनसंपर्कामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील गंभीर स्वरुपाचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणणे ,३३ वर्षाचे सेवेत वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळ्यांची गुप्त माहीती काढून धडक कारवाई करुन महाराष्ट्र सह इतर राज्यातील खुन,खंडणी दरोडा सारखे गुन्हे उघडकीस आणुन गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात हातकंडा, नवी मुंबई गुन्हे शाखा,खंडणी विरोधी पथक, दरोडा प्रतिबंधक पथक, इतर SIT मधे सकारात्मक योगदान व निष्कलंक गुणवत्तापुर्ण सेवेसाठी संजय पवार पोलीस उपनिरीक्षक वाहतूक शाखा उरण यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले.संजय पवार पोलीस उपनिरीक्षक वाहतूक शाखा उरण यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याने महाराष्ट्रातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी वर्ग, नातेवाईक, मित्र परिवार, हितचिंतक, विविध सामाजिक संघटना यांनी संजय पवार यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आहे. विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *