टेकामांडव्याचे शिवसेना नेते रामचंद्र हाके चा काँग्रेसमध्ये प्रवेश*

लोकदर्शन👉 मोहन भारती

जिवती :– आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत जिवती तालुक्यातील मौजा टेकामांडवा येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक घेण्यात आली. या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत टेकामांडवा येथील शिवसेना नेते रामचंद्र हाके यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांना काँग्रेस पक्षाचा दुपट्टा देवून स्वागत व सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी माजी प. स. सदस्य सुग्रीव गोतावळे, माजी उपनगराध्यक्ष अशफाक शेख, शंकर सोलनकर, बालाजी गोटमवाड, शिवाजी करेवाड, विश्वनाथ येरेवाड, भीमराव कदकदले, गणपत देवकते, विठ्ठल पल्लेवाड, शुभांगी राऊत, सिताराम गायकवाड, संजय भालेराव, सुनील शेळके, वजीर सय्यद यासह स्थानिक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here