उरण मध्ये तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला.

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 10ऑक्टोंबर
उरण चारफाटा येथे दिनांक 9/10/2022 रोजी संध्याकाळी उं7 च्या सुमारास तरुणांमध्ये बोलता बोलता अचानक वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत ताहा गुलजार शेख (वय 22) या तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. धारदार शस्त्र मानेवर लागल्याने सदर युवक गंभीर जखमी झाला. मानेतून मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव होऊ लागला. सदर युवकाला त्वरित उरण मधील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.मात्र रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने जखमी युवकाला पुढील उपचारासाठी नवी मुंबईमध्ये पाठविण्यात आले.या हल्ला प्रकरणी रुपेश ललन प्रसाद (वय 22)राहणार बेलपाडा, तालुका पनवेल याला उरण पोलिसांनी अटक केली असून दुसरा साथीदार मात्र पळून गेला आहे. या घटनेचा अधिक तपास उरण पोलीसांमार्फत सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here