*अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ शाखा बीड (ग्रामीणच्या) अध्यक्षपदी माननीय रंगनाथराव पैठणकर यांची निवड*

लोकदर्शन👉 राहुल खरात

अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाच्या ग्रामीण शाखा बीडच्या अध्यक्षपदी तरुण तडफदार समाजाबद्दल तळमळ असलेले तसेच महासंघाच्या कोणतेही कामासाठी धावून पुढे जाणारे खंबीर नेतृत्व असणारे माननीय रंगनाथराव पैठणकर यांची निवड काल राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जयाजीनाथ साहेब तसेच मराठवाडा अध्यक्ष माननीय सोमनाथजी धायडे साहेब तसेच बीड जिल्हा अध्यक्ष केदारनाथ चव्हाण सर व युवा मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर सुरवसे साहेब तसेच राज्यसदस्य माननीय डॉक्टर पैठणकर प्रा.यादव सर श्रीमती जयश्रीताई चव्हाण मा.भरत चव्हाण साहेब मुख्याध्यापक श्री संजय सावंत सर युवा बीड जिल्हा युवा अध्यक्ष श्री शिंदे सर श्री दत्ता शिराळकर यांच्या सहकार्याने निवड करण्यात आली. मा. रंगनाथराव पैठणकर यांच्या निवडीने सर्व समाजातील नाथ बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सर्वांनी त्यांना पुढील कार्याला सत्कार करून शुभेच्छा दिल्या त्यावेळी रंगनाथराव पैठणकर यांनीही महासंघातचे कार्य धडाडीने करेल आणि समाजाच्या विकासासाठी सर्व शक्ती पणाला लावून काम करेल अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here