गडचांदूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

 

लोकदर्शन👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर येथे 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ,यायानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथून धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .धम्मचक्र प्रवर्तन दिन चिरायू होवो ,डाँ बाबासाहेब आंबेडकर की जय,अशा घोषणा देण्यात आल्या गांधी चौकमार्गाने येऊन डा आंबेडकर पुतळ्याजवळ रॅली विसर्जित झाली. आंबेडकर पुतळ्याला अनेकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ,याप्रसंगी बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी या सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली तसेच आंबेडकर भवन येथे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण अमर लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला कविकर निरंजने, उत्तम खैरे ,माजी सभापती महेंद्र ताकसांडे, शरद बोरकर ,नगरसेविका अश्विनी कांबळे,वामनराव दुबे ,हिरा कऱ्हाडे, किशोर निरंजने, माया दुर्गे ,यांच्यासह अनेक बौद्ध बांधव उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे संचालन आशाताई सोडवले यांनी केले तर आभार राहुल निरंजने यांनी मानले ,कार्यक्रमाच्या यशस्वी साठी पंकज निरंजने ,सचिन वाघमारे, संजय ताकसांडे ,अनिल वाघमारे ,चंद्रभान खैरे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here