घुग्घुस येथे अशोक विजयदशमी साजरी

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

अशोक विजयदशमी निमित्ताने घुग्घुस येथील तहसिल कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सहभागी होऊन तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी उपस्थित सर्व समाज बांधवांना त्यांनी अशोक विजयदशमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

सम्राट अशोकाने ज्या दिवशी धम्मचक्र फिरविले होते त्याच मंगलदिनी त्या धम्मचक्राला डॉ. बाबासाहेबांनी गती दिली. तमाम जनतेच्या द्रुष्टीने ही अनन्य साधारण, कधीही न विसरण्यासारखी घटना आहे. म्हणून दरवर्षी अश्विन शुद्ध दशमीला हा दिन साजरा केला जातो. हा सण बाबासाहेबांच्या जीवनातील एक महत्वाची क्रांती आहे. या क्रांतीला जगात तोड नाही. म्हणुन अशोक विजयदशमी हा आनंदाचा सण आहे. अशी भावना याठिकाणी बोलतांना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, विनोद चौधरी, रत्नेश सिंग, साजन गोहने, अमोल थेरे, चिन्नाजी नलभोगा, प्रवीण सोदारी, हेमंत पाझारे, दिनेश बांगडे, संजय भोंगळे, भारत साळवे, दिलीप कांबळे, सुनील राम, धनराज पारखी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here