खिर्डी येथे नवरात्रची धूम ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, जय शारदा माता महिला मंडळ च्या जण वतीने विविध कार्यक्रम चे आयोजन

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
खिर्डी येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहेत.
जय शारदा माता महिला मंडळ च्या वतीने शारदादेवी ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे,शारदा मंडळ च्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत, शारदा मंडळाच्या वतीने विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, पुरुष व महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत,
गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ अनिल चिताडे,प्राचार्या सौ स्मिता चिताडे यांनी भेट देऊन दर्शन घेतले, कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी जय शारदा माता महिला मंडळ, खिर्डी च्या अध्यक्षा मंगला पंधरे, सचिव वनिता चापले,उपाध्यक्ष विमल मरसकोल्हे ,अंतकला नागोसे,माजी सरपंच अनुसया कोटनाके,शुभकांत शेरकी, बापूराव डुकरे,प्रभाकर मांडवकर, रामानंद डुकरे,व इतर गावकरी परिश्रम घेत आहेत.
,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here