भाजपा ओबीसी महीला मोर्चा द्वारा गांधी जयंती दिनी शांतीधाम येथे स्वच्छता अभियान*

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर

चंद्रपूर :- राष्ट्रगौरव यशस्वी पंतप्रधान मान. नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत भाजपाव्दारे संपूर्ण देशभरात सेवा पंधरवडा चे आयोजन करण्यात आले दि. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीचे औचित्य साधून भाजपा ओबीसी महीला आघाडी चंद्रपूर महानगर च्या वतीने स्थानिक बिनबा वार्ड परिसरातील शांतीधाम स्मशानभूमी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

*पूर्व केंद्रिय गृह राज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर* यांच्या विशेष मार्गदर्शनात तसेच भाजपा ओबीसी महिला मोर्चा अध्यक्ष सौ. वंदना संतोषवार व भाजपा ओबीसी मोर्चा चे महानगर अध्यक्ष विनोद शेरकी यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या मोहिमेअंतर्गत शांतीधाम येथील नदीलगत बांधण्यात आलेल्या परिसरात महीला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेचा संदेश दिला.

या कार्यक्रमास सुर्यकांत कुचनकार, शशीकांत म्हस्के, राहुल बनकर, शैलेश इंगोले, सचिन कोतपल्लीवार, मधुकर राऊत, शाम बोबडे, सुभाष आदमने, रवि लोनकर, शालिनी वासमवार, मुग्धा खांडे, संगीता सुर्यवंशी, रुपाली आंबटकर, मयुरी हेडाऊ, पुनम पिसे, वैशाली गौरकार, कविता कुरेवार, भावना निकमवार रेणूका घोडेस्वार, मोनिशा महावत तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व सफाई कामगारांनी या मोहीमेत सहभाग घेतला. साफसफाई हा सामाजिक व राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचा उपक्रम असल्याने हे कार्य निरंतर सुरु राहावे असे मनोगत उपस्थित महीला मोर्चाच्या स्वयंसेविकांनी या कार्यक्रमाच्या औचित्याने व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here