*शरदराव पवार महाविद्यालयात पोलिटिकल सायन्स क्लब ची स्थापना*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
*गडचांदूर*- येथील शरदराव पवार कला वाणिज्य महाविद्यालय येथे राज्यशास्त्र विषयातील विविध उपक्रम व प्रकल्प घेण्याच्या दृष्टीने पोलिटिकल सायन्स क्लब ची स्थापना महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक डॉ.संजय गोरे यांचे मार्गदर्शनामध्ये करण्यात आली.राज्यशास्त्र विषया अंतर्गत राज्यशास्त्राच्या विविध संकल्पनेवर आधारित चर्चासत्र व कार्यशाळा आयोजित करणे, स्पर्धा परीक्षेची तयारी, विधिमंडळातील कामकाजाचा अभ्यास, विविध देशांतर्गत राजकीय घडामोडी भारतीय पश्चिमात विचारवंताचे विचारावर आधारित उपक्रम तसेच स्थानिक स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थेचा तुलनात्मक अभ्यास व प्रकल्प आणि उपक्रम या क्लबच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
महाविद्यालयीन स्तरावर बीए च्या सर्व वर्गाकरिता स्वतंत्रपणे पोलिटिकल सायन्स क्लब ची स्थापना करण्यात आली आहे. बीए प्रथम वर्षाकरिता अध्यक्ष म्हणून दुर्गा चाटारे, उपाध्यक्ष- वैष्णवी रणदिवे, सचिव- अविनाश राऊत, सहसचिव -अंकित भोयर व कोषाध्यक्ष म्हणून साक्षी मालकर यांची निवड करण्यात आली. तर बीए द्वितीय वर्षाकरिता अध्यक्ष म्हणून अप्सरा बेग, उपाध्यक्ष- हर्षदा पाचभाई सचिव- आकाश कंठाळे, कोषाध्यक्ष- आकाश अडबाले तर सहसचिव म्हणून रजनीश गाडगे यांची निवड करण्यात आली आहे तसेच बीए तृतीय वर्षाकरिता अध्यक्ष म्हणून दीपक देवकते, उपाध्यक्ष रोहित दुरुतकर,सचिव-प्रतीक्षा चौधरी सहसचिव -अस्मिता मोहूर्ले तर कोषाध्यक्ष म्हणून सपना केलझलकर यांची निवड करण्यात आलेली आहे या सर्वांचे बीए च्या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी हार्दिक अभिनंदन केलेले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here