ग्लोरीयस फाउंडेशनच्या वतीने विविध ठिकाणी आरोग्य शिबीराचे आयोजन. .                                           

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा ( :– राजुरा तालुक्यातील रमाबाई नगर वार्ड राजुरा, विहिरगाव, धानोरा आणि पांढरपौणी येथे ग्लोरीयस फाउंडेशन राजुराच्या वतीने नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. नगरसेवक हरजितसिंग संधू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रामचंद्रराव धोटे प्राथमिक शाळा, रमाबाई नगर, राजुरा येथे तर विहिरगाव, धानोरा आणि पांढरपौणी येथे एकूण १८०० नागरिकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. यात प्रत्येक नागरिकांना हजार ते पंधराशे रुपये किमतीचे औषधे सुध्दा देण्यात आले.
या प्रसंगी डॉ. जेस्सी, डॉ. ज्योएल बाबू, डॉ. निस्से जेरूशा, डॉ. सरोजा व नर्सेस फादर सचिन मुद्देला, फादर आमिन, फादर नितेश, फादर जाॅन स्टान्ली यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल चेकप, आय चेकप, बल्ड शुगर चेकप, बल्ड प्रेशर अशा रुग्णांना मोफत निदान व सेवा पुरविण्यात आल्या.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, नगरसेवक हरजितसिंग संधू, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, अभिजीत धोटे, ग्लोरीयस फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश लोखंडे, विहिरगावचे सरपंच अॅड. रामभाऊ देवईकर, इर्शाद शेख, सुधीर लांडे, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here