भांबारा येथे समता सैनिक दल स्थापना दिन कार्यक्रम संपन्न.

. लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
*समता सैनिक दल ही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आघाडीची फौज आहे. जेवढे दिवस तुकड्यात मिरवाल तेवढे दिवस तुम्ही समाजाला लाचार आणि कमजोर करीत राहाल.म्हणून बाबासाहेबांच्या संघटनेच्या गटांचे तुकडे घेऊन मिरवणारे स्वयंघोषित नेते आणि त्यांचे होयबा कार्यकर्ते बाबासाहेबांचे अनुयायी कार्यकर्ते होऊ शकत नाहीत. असे प्रतिपादन बाबासाहेबांच्या संघटनेचे प्रचारक अशोककुमार उमरे यांनी केले. ते समता सैनिक दलाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित स्थळ- भांबारा मंडळ वांकिडी जि. कुमराम भिम ( आसिफाबाद ) येथे दिनांक १३ मार्च २०२२ला धम्म जागृती अभियान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.*

*सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भांबरा येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कचरूजी झाडे होते. कार्यक्रमात उमरे यांनी बाबासाहेबांच्या समता सैनिक दल, दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बद्दल माहिती देत बाबासाहेबांना अभिप्रेत धम्मराज्याच्या स्थापनेसाठी उपरोक्त संघटनेची नितांत आवश्यकता असल्याचे सांगून उपस्थितांना बावीस प्रतिज्ञा, समता सैनिकांची प्रतिज्ञा व भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका आणि भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा धम्म ग्रंथ भेट देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.*
*कार्यक्रमांचे संचालन संतोष झाडे व आभारप्रदर्शन शंकर दुर्गम यांनी केले.*
*सदर कार्यक्रमास भांबारा येथील माधवराव खोब्रागडे, दत्तात्रय झाडे, पेंटू खोब्रागडे, शंकर दुर्गम, वसंतराव खोब्रागडे, श्रीनिवास झाडे, संतोष झाडे, प्रविण कुमार झाडे, किरण झाडे, कौसल्या खोब्रागडे, प्रमिला झाडे, संध्या खोब्रागडे, सुनिता दुर्गम, दुर्गाबाई चुनारकर, रेवता झाडे, जे. पावर्ता व बाल बौद्ध मंडळ चे कार्यकर्ते उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here