अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुभाष धोटेंचा लक्षवेधी प्रश्न.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुभाष धोटे यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून चंद्रपूर जिल्ह्य़ातील थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे वेधले सभागृहाचे लक्ष.
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी चंद्रपूर थर्मल महाऔष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पामध्ये प्रशिक्षणार्थी नोकर भरती मध्ये नोकरी देताना महानिर्मितीच्या मुख्य कार्यालयाने दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ च्या दिलेल्या गाईडलाईन (सुचनाचे) चे पालन केले काय ?, नोकरीसाठी निवड केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी सी टी पी एस ने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीला 128 पैकी 115 उमेदवारांची कागदपत्रे खोटी आढळली आहे हे खरे आहे काय? ( निवड यादी प्रकाशित दिनांक 8 नोव्हेंबर २०२१), पालन केले असल्यास खोटी कागदपत्रे तयार करून नोकरीची मागणी करणाऱ्या उमेदवारांना नोकरीवर कसे सामावुन घेण्यात आले ?, या सर्व प्रकणात जे कोणी दोषी अधिकारी आहेत त्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करणार काय ? असे प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष लोकहिताच्या प्रश्नावर वेधून
लक्षवेधी प्रश्नाच्या माध्यमातुन चंद्रपूर जिल्ह्यातील थर्मल पावर स्टेशनच्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार धोटे यांनी आवाज उठविला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील थर्मल पावर स्टेशन च्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here