महाराष्ट्रातून काही सूचना प्राप्त झाल्या आहेत* ÷विलास खरात सचिव, डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान

लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात

. परिवर्तन विचार मंच ने आपले नाते संपूर्ण महाराष्ट्र राज्यात निर्माण केले आहे . आर्थिक आणि वेळे अभावी आपण एकत्र येऊ शकत नाही . पण सोशल मीडियातून एकत्र येऊन आचार विचार करू शकतो. काल मी डॉ. शंकरराव खरात संदर्भात एक पोस्ट शेयर केली होती. त्या संदर्भात काही नी फोन करून संवाद केला. तर काही नी लिखित सूचना केल्या आहेत. मराठी साहित्य रत्न डॉ शंकरराव खरात जन्मशताब्दी वर्षानिमित्त परिवर्तन विचार मंच नियमित विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे. या संदर्भात आपल्या काही सूचना आणि उपक्रम असल्यास मनमोकळे पणाने सांगा. 9421588901 बी वाय जगताप पुणे ,ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करणे . 1/ डॉ शंकर राव खरात कथा स्पर्धा विभागीय न राज्य स्त्तर वर आयोजित करावी. सूचना : पुरुषोत्तम पारधे जळगाव खानदेश 2/ या काळात प्रकाशित झालेल्या पुस्तकांना डॉ शंकर राव खरात जन्म शताब्दी पुरस्कार देण्यात या.या करिता परिवर्तन विचार मंच कडे दोन पुस्तके पाठविणे अपेक्षित आहे. सूचना: उद्योजक दिलीप कांबळे रावेर , ३/ ९ एप्रिल डॉ.शंकर राव खरात यांचा निर्वाण दिवस साजरा करणे : ज्येष्ट पत्रकार मिलिंद फुलझेले . ४/ डॉ शंकर राव खरात जन्म शताब्दी निमित्त सामाजिक जन जीवनावर आधारित चित्रकला दिवस साजरा करणे : सूचना : चित्रकार हेमराज भगत रत्नागिरी . ५/ परिवर्तन अंक प्रकाशित करणे ,सूचना: प्रा. भीमराव गायकवाड नागपूर ६/ डॉ शंकर राव खरात जन्म शताब्दी कार्यक्रम आटपाडी जिल्हा सांगली येथे समारोप सोहळा आयोजित करणे . सूचना : विलास खरात आटपाडी जिल्हा सांगली . वरील सर्व सूचना प्राप्त झाल्या आहेत. सहभागी सर्वांचे स्वागत आहे. परिवर्तन विचार मंच ची सभा आयोजित करण्यात येईल.

थोर साहित्यिक डॉ शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, त्यांच्या जन्म दिनी सांगता समारोप सोहळा साजरा करणेबाबत महाराष्ट्रातुन काही सुचना आलेल्या आहेत,मा बाळासाहेब रास्ते सांगली यांनी, सांगितले आहे की, डॉ शंकरराव खरात जन्म शताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात यावे, नियोजनात सहभागी होणार आहे,मा अरुण कांबळे बनपुरीकर यांनी जन्मशताब्दी वर्ष कसे साजरे करावेत यांचा आराखडा सादर केला आहे तसेच साहित्यिक संताजी देशमुख आटपाडी जिल्हा सांगली, यांनी जन्म शताब्दी वर्षानिमित्त ची दिशा व धोरण, रुपरेखा मांडणी केली आहे,अशा अनेक जिल्ह्यांतून चांगल्याप्रकारे प़तिकिया येत आहेत नागपूर येथील मा , विलास गजभिये सर यांच्या माध्यमातून विदर्भात मोठ्या प्रमाणात साहित्य चळवळ सुरू केली आहे

आयु विलास खरात सचिव डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी जिल्हा सांगली,मो, नंबर ९२८४०७३२७७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here