गडचांदुर येथे ऐ आय एम आय एम च्या वतीने शिवजयंती साजरी.                                                                 

 लोकदर्शन 👉 मोहन भारती।

                                  गाडचांदूर
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमिन पक्षाचे वतीने शिवजयंती चे निमित्ताने शिवमहोत्सव व पक्ष प्रवेश समारंभ चे आयोजन करण्यात आले, यावेळी राज्य प्रवक्ता प्रा जावेद पाशा यांचे पेट्रोल पंप चौकात भव्य स्वागत करण्यात आले. व मोटार सायकल रॅली ने त्यांना कार्यक्रम स्थळी आणल्या गेले सर्व प्रथम मौलाना साजिद अश्रफी चंद्रपूर यांनी कुराण पाक ची आयात वाचून कार्यक्रमाची सुरुवात झाली. रयतेचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज याचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेची सुरवात करण्यात आली.यावेळी जिल्हा अध्यक्ष ऍड. नाहीद हुसैन,कोरपना तालुका महिला अध्यक्ष शमा शब्बीर शाह, गडचांदूर शहर कार्यकारणी चे पदाधिकारी हजर होते.यावेळी विविध राजकीय पक्षांच्या पुरुष,महिलांनी,ए आय एम आय एम पक्षात प्रवेश केला, या साठी शब्बीर शाह याची मेहनत होती,यावेळी महिला कार्यकारणी गठित करण्यात आली .महिला तालुका अध्यक्ष शमा शब्बीर शहा ची तर शहर अध्यक्ष तर उपाध्यक्ष गीताबाई बबन तेलतुंबडे याची शहर अध्यक्ष अर्शिया पठाण तर उपाध्यक्ष आशू इलियास पठाण,सचिव मुयरूम रहीम शेख याची निवड करण्यात येऊन राज्य प्रवकता प्रा.जावेद पाशा चे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी जावेद पाशा यांनी शिवजयंती निमित्त व्याख्यान मधे शिवाजी महाराजाचे महिला विषयी धोरण,सर्व धर्म विषशी राजकारण हे कोणावर अन्याय करणारे नव्हते असे सांगितले,मंचावर पक्ष अध्यक्ष एड. नाहीद हुसैन, महासचिव अश्रफ खान, चंद्रपूर अध्यक्ष अझहर शेख,मौलाना साजिद, जाकीर शेख,सोहेल मिजवाही,तालुका अध्यक्ष रफिक शेख, शहर अध्यक्ष मुमाफ शेख,शेख रऊफ,सोहेल शेख,शेख दस्तगीर, युवा अध्यक्ष मोईनोद्दीन उस्मान बेग,उपाध्यक्ष तोसीफ सय्यद सादिक सह सर्व पदाधिकारी हजर होते.कार्यक्रमाचे संचालन तिलक पाटील यांनी केले तर प्रास्ताविक व आभार रफिक शेख यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here