लोकदर्शन डोंबिवली (प्रतिनिधी –👉 गुरुनाथ तिरपणकर)
डोंबिवली (प्रतिनिधी – गुरुनाथ तिरपणकर) : सध्या अनेक नागरिकांना मधुमेहाचा त्रास होत असून, या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी साखरेच्या ऐवजी लो-गो शुगर फ्री पॅकेट्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. चहा, कॉफी, सेरेलॅक, फळे, केक, मिठाई, पुडिंग्ज अशा विविध पदार्थांमध्ये साखरेचा उत्तम पर्याय म्हणून या पॅकेट्सचा उपयोग होतो.
याच पार्श्वभूमीवर जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने डोंबिवली येथील एमआयडीसी निवासी भागातील सिद्धिविनायक मंदिर तसेच सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथे मधुमेह पीडितांना लो-गो शुगर फ्री पॅकेट्सचे विनामूल्य वाटप करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, खजिनदार दत्ता कडुलकर, जेष्ठ सल्लागार अरविंद सुर्वे, हिंद सेना फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश दाभोळकर, समाजसेवक बाळकृष्ण देसाई तसेच मंगेश खोत आदी मान्यवर उपस्थित होते.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ सल्लागार अरविंद सुर्वे यांचे विशेष सहकार्य लाभले. या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केले.





