Home
Home गडचांदूर / कोरपणा नंदविजय फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या जिनिंग व वस्त्रगृहाचे उदघाटन

नंदविजय फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या जिनिंग व वस्त्रगृहाचे उदघाटन

By : Shankar Tadas
कोरपना : चनाई खुर्द (जेवरा फाटा) ता. कोरपना येथे नंदविजय फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या शेतकरी उत्पादक कंपनीच्या नवीन जिनिंग व वस्त्रगृहाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर आर्णी क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर तर उदघाट्क चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, दिनेश चोखारे…श्रीधर गोडे, रोहित बोम्मा वार, आवेश पठाण, चनईचे सरपंच अरुण मडावी, गणेश तर्वेकर, निशिकांत सोनकांबळे, धनंजय छाजेड आदींची प्रमुख उपस्थिती होती. विजयराव बावणे, अशोकराव बावणे, नंदाताई बावणे, नितीन बावणे, तुषार बावणे, कांचन बावणे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here