लोकदर्शन राजुरा👉मोहन भारती
राजुरा ( 21डिसेंबर), — राजुरा नगरपरिषदेत नगर विकास आघाडीनं जोरदार मतप्रवाह दाखवत सत्ता आपल्या हातात घेतली आहे. अध्यक्षपदी नगर विकास आघाडीचे उमेदवार अरुण रामचंद्र धोटे यांनी विजय मिळवला. त्यांनी 9011 मतांपैकी निर्णायक आघाडी गाठत भाजपचे राधेश्याम लक्ष्मी नारायण अडाणीया (6278 मुले) यांना 2733 मतांनी पराभूत केले.
एकूण 21 पदांपैकी नगर विकास आघाडीला एकूण 17 नगरसेवक जागा मिळाल्या असून भारतीय जनता पक्षाला 4 जागा प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हा विजय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाषभाऊ धोटे व शेतकरी संघटनेच्या नेते व माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या संयुक्त नेतृत्वाखालील आघाडीचा मानला जात आहे. स्थानिक भाजपाला (आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली) या निवडणुकीत मोठा पराभव बसला आहे.
नगर विकास आघाडीच्या विजयी नगरसेवकांची यादी (प्रमुख नावे):
– प्रभाग 1: स्वप्निल मोहुर्ले
– प्रभाग 2: सिद्धार्थ पथाडे, मंगला मोकडे
– प्रभाग 3: पौर्णिमा सोयाम, गोलू ठाकरे
– प्रभाग 4: नीता बानकर
– प्रभाग 5: फरीना शेख
– प्रभाग 6: इंदुताई निकोडे, प्रभाकर नळे
– प्रभाग 7: पूनम गिरसावडे
– प्रभाग 8: वज्रमाला बतकमवार, दिलीप डेरकर
– प्रभाग 9: अनंता ताजने, संध्या चांदेकर, अनु हर्जितसिंग संधू
– प्रभाग 10: गीता पथाडे
अपक्ष उमेदवार जुबेर शेख यांना प्रभाग क्रमांक 10 मध्ये ईश्वरीय चिठ्ठीद्वारे विजय घोषित करण्यात आला असून त्यांनी निवडीनंतर नगर विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केल्याचे आगाऊ कळले. त्यामुळे आघाडीची एकूण संख्या अधिक प्रभावी झाली आहे.
भारतीय जनता पक्षाचे विजयी नगरसेवक:
– प्रभाग 1: मयुरी पहानपटे
– प्रभाग 4: अमोल चिल्लावार
– प्रभाग 5: भूपेश मेश्राम
– प्रभाग 6: प्रफुल कावळे
निकाल घोषित होताच नगर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष साजरा केला. काँग्रेस व शेतकरी संघटना व मित्रपक्षांचे नेते व नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी जनतेच्या पाठिंब्याबद्दल आभार मानून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तात्काळ काम करण्याचे निर्धार व्यक्त केला आहे. पुढील काळात पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता व इतर सर्वांगीण विकास कार्यक्रमांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
अधिकृत प्रमाणित निकाल आणि पदाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अंतिम नामनिर्देशन व अधिकारांची अधिक माहिती समोर येईल.





