लोकडार्शन इंदापूर 👉 गणेश धनवडे
गणेश धनवडे प्रतिनिधी यांच्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावात दत्त जयंती अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी दत्त मंदिरामध्ये श्री दत्ताच्या पादुकांचे पूजन आणि अभिषेक विधीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. हा अभिषेक श्री रामचंद्र नारायण महारनवर यांच्या हस्ते पार पडला.
यानंतर दुपारी धार्मिक कार्यक्रमांची मालिका पुढे सुरू ठेवत महादेव भजनी मंडळ, निमसाखर यांचा भजन कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. भजनाच्या स्वरांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. दुपारी बारा वाजता श्री दत्तांच्या चरणावर पुष्पवृष्टी करून भक्तांनी आपली सेवा अर्पण केली.
कार्यक्रमानंतर ग्रामस्थांच्या वतीने सर्व भक्तांना महाप्रसाद देण्यात आला. तसेच श्री अशोक शंकर होमकर यांच्या तर्फेही महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
संध्याकाळी सात वाजता गावातील प्रमुख रस्त्यांवरून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीची ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. भजन, कीर्तन आणि हरिनामाच्या गजरात संपूर्ण ग्रामप्रदक्षिणा उत्साहात पार पडली. त्यानंतर दत्त मंदिरामध्ये स्वामींची आरती व जप घेण्यात आला.
या सर्व कार्यक्रमांना निमसाखर गावातील सर्व स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दत्त जयंती निमसाखर गावात भक्तिभाव, श्रद्धा आणि एकात्मतेचे दर्शन घडवत दिमाखात साजरी झाली





