लोकडार्शन 👉 मोहन भारती
राजुरा (3डिसेंबर) – राजुरा–गडचांदूर रोडवरील श्री संत संताजी जगनाडे महाराज सांस्कृतिक सभागृहात, तेली समाज युवक मंडळ रामपूर व राजुरा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने ८ डिसेंबर २०२५ रोजी संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. समाजातील ऐक्य, सांस्कृतिक वारसा आणि संतांच्या आदर्शांचे स्मरण यासाठी दरवर्षी आयोजित केला जाणारा हा जयंती महोत्सव यावर्षी अधिक उत्साहात पार पडणार आहे.
मान्यवरांची प्रतिष्ठित उपस्थिती
या महोत्सवाचे अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त चंद्रप्रकाश बुटले विराजमान राहणार आहेत. तसेच राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त निवृत्त सुभेदार शंकरराव मेंगरे, राजुरा–रामपूर परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजप्रबोधन करणारे कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी या उत्सवाला उपस्थित राहणार आहेत.
समाजातील कर्तृत्ववानांचा विशेष सत्कार
कार्यक्रमात समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणारे बांधव, गुणवंत विद्यार्थी तसेच तालुक्यातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून, हा सोहळा कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा
दुपारी १२ वाजता प्रतिमापूजन व आरतीने कार्यक्रमाची सुरुवात
स्वागत समारंभ
प्रास्ताविक
मान्यवरांचे मनोगत
सत्कार–गौरव सोहळा
दुपारी ३ ते ७ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन
या कार्यक्रमासाठी जेष्ठ तेली समाज मंडळ, तेली समाज महिला मंडळ, संताजी महिला बचत गट तसेच तेली समाज बहुउद्देशीय मंडळ राजुरा यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
समाज बांधवांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन
राजुरा तालुक्यातील सर्व तेली समाज बंधू–भगिनींनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती महोत्सव भव्यदिव्य करण्याचे आवाहन
अध्यक्ष अनंता येरणे,
उपाध्यक्ष प्रा. देविदास कुईटे,
प्रविण वैरागडे,
कोषाध्यक्ष किशोर रागीट,
सचिव जगदिश साठोणे,
सहसचिव बळवंत चन्ने,
तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.





