Home
Home गडचांदूर / कोरपणा डिजिटल मीटरला गावकऱ्यांचा जोरदार विरोध, वाढीव विद्युत बिलांच्या तक्रारींवरून जुने मीटर...

डिजिटल मीटरला गावकऱ्यांचा जोरदार विरोध, वाढीव विद्युत बिलांच्या तक्रारींवरून जुने मीटर बसविण्याची मागणी 🔴 खिरडी ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक ठराव

By : Shankar Tadas

गडचांदुर :

गावात बसविण्यात आलेल्या डिजिटल मीटरांमुळे वाढीव आणि अवास्तव विद्युत बिल आकारले जात असल्याच्या तक्रारींवरून खिरडी ग्रामपंचायतीने महाराष्ट्रातील पहिला असा ठराव एकमताने पारित केला आहे. दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी एकमुखी मताने निर्णय घेतला की, डिजिटल मीटर तात्काळ हटवण्यात यावेत व जुन्या पद्धतीचे मीटर पुन्हा बसवून द्यावेत.

ग्रामसभेत जोरदार चर्चा

गावकऱ्यांनी डिजिटल मीटर बसवल्यापासून त्यांच्या वीज बिलात अचानक वाढ झाल्याची तक्रार केले. काही घरांचे बिल दुप्पट तर काहींचे तिप्पट येऊ लागल्याने ग्रामसभेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. वाढत्या आर्थिक ताणामुळे ग्रामसभेत डिजिटल मीटरविरोधात तीव्र भावना व्यक्त झाल्या आणि शेवटी सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला.

हा ऐतिहासिक ठराव ग्रामपंचायत सरपंच श्यामराव सलाम यांच्या अध्यक्षतेखाली, तर उपसरपंच दिपक खेकारे यांच्या उपस्थितीत मांडण्यात आला. गावकऱ्यांची एकमुखी ठराव मंजूर केला.

महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत

खिरडी ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे ज्यांनी वाढीव वीज बिलांच्या तक्रारींवरून डिजिटल मीटर हटवण्याचा आणि जुने मीटर बसविण्याचा ठराव अधिकृतरीत्या पारित केला. त्यामुळे या ठरावाकडे जिल्हा व राज्यातील इतर ग्रामपंचायतींचे लक्ष वेधले गेले आहे.

महावितरण कार्यालयात निवेदन

ग्रामसभेनंतर दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ ला, गावकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (म.रा.वि.म.) कार्यालय, गडचांदूर येथे तातडीने निवेदन सादर केले. यात डिजिटल मीटर तातडीने हटवून जुन्या मीटरची पुनर्बांधणी करण्याची मागणी करण्यात आली. ठरावाची प्रत आणि ग्रामसभेचा निर्णय अधिकाऱ्यांना देत गावकऱ्यांनी वीज बिल वाढीची उदाहरणेही सादर केली. यावेळी

उपसरपंच दिपक खेकारे, माजी उपसरपंच अनुसया कोटनाके,नितेश धानोरकर,रवींद्र मुक्के,सुभाष वायकोर,सतीश राखुडे,प्रशांत हिवरकर,बबन फड, भाऊराव ठाकरे,नामदेव झगझप आदींची उपस्थित होती

गावकऱ्यांचा इशारा

गावकऱ्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की, जर एक महिन्याच्या आत डिजिटल मीटर हटवून जुन्या मीटरची पुनर्बांधणी करण्यात आली नाही, तर गावकरी स्वतः मीटर काढून महावितरण कार्यालयात ठेवतील, तसेच पुढील ग्रामसभेत कठोर निर्णय घेण्यात येईल.

खिरडी ग्रामपंचायतीचा हा ठराव आणि पुढाकार राज्यातील इतर गावांसाठी देखील प्रेरणादायी ठरू शकतो. डिजिटल मीटरमुळे वाढलेल्या वीज बिलांच्या तक्रारींना सामोरे जाणाऱ्या अन्य गावांनीही अशाच पद्धतीने आपला आवाज उठविण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

प्रतिक्रिया

आम्ही ग्राम सभेत ठराव पारित केला असून आम्हाला आमचे जुने मीटर लावून न दिल्यास आम्ही वेगळा मार्ग अवलंबवू

दिपक खेकारे उपसरपंच ग्रा.पं.खिरडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here