Home
Home गडचांदूर / कोरपणा एबीपीएस, आवरपूर मुलींचा सलग दुसऱ्या वर्षी विभागीय विजेतेपदावर कब्जा

एबीपीएस, आवरपूर मुलींचा सलग दुसऱ्या वर्षी विभागीय विजेतेपदावर कब्जा

By : Shankar Tadas

नांदाफाटा (कोरपना)
आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, आवारपूरच्या 19 वर्षांखालील मुलींनी जिल्हा क्रीडा कार्यालय, भंडारा यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत विभागीय हॉकीचे विजेतेपद पटकावले.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात, आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, आवारपूरच्या संघाने वर्धा जिल्ह्याचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 2-1 असा पराभव केला, तेजस्वी संपत येल्लावेणी आणि प्रियांशी येडे यांनी केलेल्या गोलच्या जोरावर हा संघ सांगली येथे होणाऱ्या SGFI राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करेल.

या पथकात प्रियांशी येडे (कर्णधार), हर्षाली गोंडे, श्रावणी खनके, हिमानी सूर, दिव्या धानोरकर, प्राची गोडे, अवनी कोतपल्लीवार, पूर्वी प्रमोद रिठे, वैष्णवी सुरनार, देवानंदना दिलीपकुमार, रिंकू रॉय, तेजस्वी संपत येल्लावेनी, बर्नाली खटुआ, प्रिमल पाइस आणि रिशा कुमार यांचा समावेश होता.
संघाचे प्रशिक्षक हॉकी इंडिया लेव्हल-२ प्रशिक्षक भूपेश काळे होते, तर व्यवस्थापक किरण टिमोथी होते. प्राचार्य संजीत सोनी यांनी खेळाडूंचे त्यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here