घटनेचे शिल्पकार,महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३वी जयंती जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने साजरी

 

लोकदर्शन कल्याण👉-गुरुनाथ तिरपणकर

गेली तीन वर्षे जनजागृती सेवा संस्था ही सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहुन विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे,त्याच अनुषंगाने बदलापूर,अंबरनाथ,डोंबिवली येथे गेली तीन वर्षे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.यावर्षी कल्याण येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात संस्थेच्या वतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका पालिकेच्या आयुष्य इंद्रायणी जाखड,अॅन्टीपायरसी सेल मुंबईचे मुख्य तपाशी अधिकारी रामजित गुप्ता,ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष अरविंद म्हात्रे,अभिनेत्री-समाजसेविका करुणा कातखडे,शब्दसुमने साहित्यिक मंचच्या अध्यक्षा अनिता कळसकर,जागृत तहलका न्यूज च्या रिपोर्टर आशा पडवळ,राईट्स ऑफ वुमेन फाऊंडेशनच्या अध्यक्षा दिपा गांगुर्डे,कवी-जेष्ठ वृत्तपत्र लेखक सुधाकर कांबळी,ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाचे सदस्य जेष्ठ पत्रकार नाना म्हात्रे,आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या वतीने शिक्षण समितीचे माजी सभापती,बिर्ला काॅलेजचे माजी उप प्राचार्य प्रा.उदय सामंत सर यांनी घटनेने दीलेला अधिकार यामुळेच आपण येथे आहोत,तसेच सद्य राजकीय व सामाजिक क्षेत्रातील परीस्थितीवर आपले परखडपणे मत व्यक्त केले.शेवटी संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांना आकर्षक आभार पत्र देऊन सन्मान करण्यात आला.अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *