जेएनपीटी च्या कामगार नेत्यांची निर्दोष मुक्तता.

 

लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममताबादे

दि ९ एप्रिल.२०२४जेएनपीटी वर्कर्स युनियन तर्फे कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात प्रशासनाच्या विरोधात दिनांक ०७ जानेवारी २०२२ रोजी लाक्षणिक उपोषण केले होते. त्या संदर्भात युनियनच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. त्या गुन्ह्यांमधून मा. न्यायालय उरण यांनी रविंद्र पाटील, सुरेश पाटील, बी के ठाकूर, प्रकाश नाचरे, जे के भोईर आणि मंगेश ठाकूर या सर्व जणांची दिनांक ०६.०४.२०२४ रोजी निर्दोष मुक्तता केली आहे.

युनियनच्या वतीने प्रशासानासोबत वेळोवेळी बैठका घेऊन कामगारांच्या भवितव्यासंदर्भात प्रशासनाने लेखी करार करावा, मयत कामगारांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यात यावे, तसेच निवृत्त कामगारांच्या वारसांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी हे आंदोलन करीत होतो, परंतु, प्रशासन दाद देत नव्हती त्याच्या निषेधार्थ दिनांक ०७.०२.२०२२ रोजी लाक्षणिक उपोषण केले होते.याचाच मनात राग धरून प्रशासनाने कामगार नेत्यांवर गुन्हे दाखल केले होते.

दिनांक ०६.०४.२०२४ रोजी मा. न्यायालय उरण यांनी रविंद्र पाटील, सुरेश पाटील, बी के ठाकूर, प्रकाश नाचरे, जे के भोईर आणि मंगेश ठाकूर या सर्व पदाधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. संघटनेच्या वतीने ऍडव्होकेट रत्नदीप पाटील, अमर पाटील यांनी न्यायालयात भक्कमपणे कामगारांची बाजू मांडली.विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क, फी न घेता निःशुल्क पणे बाजू मांडली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *