हायवाद्वारे मायकालपूर येथून होणाऱ्या रेती वाहतुकीला गावाकऱ्यांचा विरोध, वाहने परत पाठविली

By : Shankar Tadas
कोरपना : राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकरिता मायकालपूर येथील नाल्यातून हायवाद्वारे होत असलेली रेतीची वाहतूक गावाकऱ्यांनी रोखली. या अवजड वाहतुकीमुळे नुकताच नवीन तयार झालेला आसन खुर्द-कढोली खुर्द हा नवीन मार्ग खराब होत असून तो दुरुस्त करून देण्याची लेखी हमी सदर कंत्राटदार कंपनीने द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. 3 मार्च रोजी रात्री 9 वाजता बोरी नवेगाव येथील शिक्षक साईनाथजी कुंभारे यांनी यासंदर्भात हायवा चालकांना विचारणा केली. रस्ता दुरुस्तीची लेखी हमी ग्रामपंचायतीला द्यावी याकरिता संबंधित मॅनेजरशी बोलणे केले. मॅनेजर यांनी सरपंच निर्मला मरस्कोल्हे यांना बोलाविले. मात्र वाहन नसल्याने येऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. सरपंच उपस्थित न झाल्याने सदर वाहने परतविण्यात आली. यावेळी कढोली खुर्द, आसन खुर्द, बोरी नवेगाव येथील बरेच नागरिक गोळा झाले होते. मात्र कोणताही तोडगा निघाला नाही. ग्रामपंचायत सदस्य प्रशांत मसे यांनी सदर मॅनेजरला समस्या समजावून दिली, तसेच रस्ता दुरुस्तीच्या लेखी हमीनंतरच रेती वाहतूक करावी असे सांगितले. दोन आठवड्यापूर्वी प्रेमकुमार बोन्डे आणि गावाकऱ्यानी या वाहतुकीविरोधात आवाज उठविला होता. तेव्हा काही दिवस वाहतूक बंद होती. आज पुन्हा रेती वाहतूक सुरू झाल्यामुळे लोकांनी विरोध दर्शवीत रस्ता दुरुस्तीची लेखी हमी मागितली.
लोक रस्त्यावर येऊन समस्या मांडत असताना येथे कोणताही शासकीय अधिकारी किंवा ग्रामपंचायत पदाधिकारी पोहचले नाही. त्यामुळे गावकऱ्यानी संताप व्यक्त केला. संबंधित शासकीय अधिकारी यांनी या समस्येकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणीही गावकऱ्यानी यावेळी केली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *