राजुरा काँग्रेसने केले राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्रीजींना अभिवादन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– राजुरा तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस कमीटी कार्यालय, गांधी भवन राजुरा येथे अहिंसेचे पुजारी वंदनीय राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित सर्व सदस्यांनी पुज्य बापूंच्या जयंतीनिमित्त संकल्पबध्द होत जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश इत्यादी सर्व प्रकारच्या भेदभाव न पाडता एकतेने, अहिंसेने कार्य करीत जनसेवा करण्याचा संकल्प केला.
या प्रसंगी अँड. सदानंद लांडे, सेवादलचे दिनकर कर्नेवार, माजी उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे, यु. काँ. जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष एजाज अहमद, महिला अध्यक्ष निर्मला कुळमेथे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, कुंदा जेनेकर,सय्यद सकावत अली, कृ. उ. बा. स. सभापती विकास देवाडकर, संचालक जगदिश बुटले, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, गजानन भटारकर, शंकर गोनेलवार, वंसत चन्ने, संदेश करमनकर, पंढरी चन्ने, कवडु सातपुते, धनराज चिंचोलकर, सर्वानंद वाघमारे, उमेश गोनेलवार, प्रणय लांडे, सय्यद साबीर, उईके सर, लक्ष्मण ऐकरे, नागोबा पोलेवार, राजाराम येल्ला, चेतन जयपुरकर, चंद्रशेखर चांदेकर, आकेश चोथले, विजय पिंगे, देवेंद्र गंदेवार, पुनम गिरसावडे, अर्चना गर्गेलवार, नंदा गेडाम, भावना मडावी, इंदू निखोडे, संजु कुळमेथे, गांवडे, संजय मुसळे, प्रभाकर कानमपल्लीवार, महेंद्र बोबडे, साईनाथ वडस्कर, प्रमोद कानमपल्लीवार, अनिल बोंडे, सतिश बोढे यासह अनेक कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *