जिल्हा परिषदेचे शिक्षक विशाल बोधाने सेट परीक्षा उत्तीर्ण

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
वरोरा येथील रहिवासी विशाल नारायणराव बोधाने यांनी प्राध्यापक पदासाठी पात्रतेचा निकष असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या सेट परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात नेत्रदीपक यश संपादन केले आहे,या परीक्षेत विशालने राज्यशास्त्र विषय घेऊन परीक्षा दिली,पेपर एक मध्ये ६४ गुण तर पेपर दोन मध्ये विक्रमी असे १२२ गुण प्राप्त केले या परीक्षेत राज्यशास्त्र विषयाचा कटऑफ १६२ असून विशालने तब्बल १८६ गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले विशाल बोधाने हे सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोला केंद्र चनई, पंचायत समिती कोरपना अंतर्गत सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. लहान बालकांना शिकवण्या सोबतच स्वतःच्याही ज्ञानात भर घालणाऱ्या विशालने विविध विषयातील उच्च शिक्षणाच्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत .सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण, ग्रामविकास आणि क्रिडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या विशालचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, पत्नी, सहकारी व मित्रांना दिलेले आहे.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *