बीड जि.प.प्रा.शा. नफरवाडी येथे चिमुकल्यांचे स्वागत वाजत गाजत बळीराजाच्या रथातून!

लोकदर्शन बीड पाटोदा : 👉राहुल खरात

जावे आनंदाच्या गावा I दयावा आनंद आणि आनंदचि घ्यावा ॥
… आज सकाळी सकाळी झाडावर पाखरांची पिलं आणि रस्त्यावर आमच्या शाळेची मुलं किलबीलताना पाहुन ४५ दिवस मनाला सुट्टीमुळे आलेली मरगळ क्षणार्धात चैतन्यात रुपांतरीत झाली …
कारण होते … ” प्रवेशोत्सव ” … !
आज दि 15/6/23 रोजी शाळेत ई 1 लीत प्रवेशित होणाऱ्या चिमुकल्यांची बैलगाडीतून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.मिरवणूकीमध्ये, गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रा.प.सदस् , शा.व्य.समिती अध्यक्ष ,उपाध्यक्ष सर्व सदस्य, शिक्षणप्रेमी नागरीक, शाळेचे माजी विद्यार्थी, तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मिरवणुकीनंतर शाळेत नवगतांचे स्वागत गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन करण्यात आले.
तदनंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुस्तके वाटप करण्यात आले .
एरवी शाळेचे नाव काढताच आईच्या पदराआड दडणारं छकुलं आज मात्र विजयी सैनिका सारख डौलात नव्या सवंगड्यांच्या ताफ्यात सहभागी होत होतं .
अश्या प्रकारे प्रवेशोत्सव मोठया थाटामाटात साजरा केला .. !!!
प्रा. शा. नफरवाडी शाळेमध्ये आता बालक कधीही रडत _ रडत शाळेत येणार नाही कारण त्यांना पहिल्याच दिवशी आनंद संस्कार करून शाळेत आणले आहे .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.खंडागळे सर,काकडे मॅडम,वावरे मॅडम तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *