लखमापूर येथे सभागृह बांधकामाचे आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते भूमिपूजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना :– कोरपना तालुक्यातील मौजा लखमापूर येथे सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ अंतर्गत आमदार स्थानिक विकास निधीतून स्थानिक भोईसमाजासाठी शासकिय खुल्या जागेत सभागृह बांधकाम करणे अंदाजे किंमत १५ लक्ष रूपयाच्या विकासकामाचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी वाल्मीकी महाराज यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी आ. धोटे यांनी सांगितले की लखमापूर गावाच्या विकासासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहू. वाल्मीकी मस्यपालान सहकारी संस्था भोई समाज बांधव यांनी पारंपरिक व्यवसाय सोबत जोड धंदा करण्यावर भर दिला पाहिजे आणि वाल्मिकी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन उत्तम शिक्षणाच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास साधला पाहिजे असे सांगितले.
या प्रसंगी सरपंच अरुण जुमनके, उपसरपंच संभाजी टेकाम, माजी तालुकध्यक्ष तथा जेष्ठ नेते विठ्ठलराव थिपे, भोई समाज अध्यक्ष सुरेश केसुरकर, अध्यक्ष तंटा मुक्त स. अध्यक्ष पुरुषोत्तम पिंपळकर, सचिव श्रावण गेडाम, युवक तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, देवराव थीपे, ग्राम पंचायत सदस्य प्रमोद सिडाम, नितीन जूनघरे, शुभम थिपे, देविदास भोयर, संभाजी खामनकर,कवडू जुनघरे, वाघुजी भोयर, चंद्रभान जूनघरे, अर्जुन भोयर, गिरजाबाई मडावी, संदिप बावणे, अरुण उरकुडे, शुभम उरकुडे, हरिदास पारखी, सुरेश कावडे, नागरीक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर थिपे यांनी, प्रस्ताविक देविदास भोयर यांनी तर आभार प्रदर्शन संदिप बावणे यांनी मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *