अपना घर वृद्धाश्रम रुयाळ येथे शिवजयंती.

लोकदर्शन👉 अशोक.गिरी

पवनी:- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३वी.जयंती‌‌ अपना घर वृद्धाश्रम येथे रुयाळ ग्रामपंचायत उपसरपंच मेनवाढे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख अतिथी म्हणून पास्टर रोशन मेश्राम यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी उपसरपंच मेनवाढे यांनी शिवरायांच्या जीवनातील विविध प्रसंग व त्यांचे कार्य याविषयी उपस्थित सर्वांना माहीत देत प्रकाश टाकला.शिवरायांना‌‌ अभिवादन करुन जय जय महाराष्ट्र माझा हे स्फूर्ती गित सामुहिकपणे गायन करुन कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी वृद्धाश्रमातील वृद्ध व्यक्ती, ग्रामस्थ तथा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष्या सुषमा मेश्राम सचिव शालुबाई टेकाम, निलिमा बिसने, ज्योती खापरीकर, प्रमिला मानापुरे, शारदा पचारे, संगिता देऊळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here