कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर सी.डब्ल्यू.सी.द्रोणागिरी नोड सुरू होणार

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 11
दिवंगत लोकनेते दि. बा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली 1984 च्या शौर्यशाली व गौरवशाली लढ्यात पंच हुतात्मे व अनेकजण गोळीबारात जखमी झाले होते त्यांचे वारस तसेच पागोटे पाणजे व म्हालन परिसरातील 350 प्रकल्पग्रस्त कामगारांना 1987-88 साली रोजगार देण्यात आला होता. परंतु सी डब्ल्यू सी कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे स्थानिक कामगार व डि.नोड वर अवलंबून असणाऱ्या हजारो प्रकल्पग्रस्त, ट्रक मालक,टेम्पो ओनर्स, चहा टपरी यांचा रोजगार बुडाला होता.मध्ये अनेक कंत्राटदार येऊन गेले परंतु ते अयशस्वी झाले.त्यामुळे 2015 पासुन ते आजतागायत कामगार बेरोजगार राहिले.सी डब्ल्यू सी कंपनीच्या दिल्ली स्थित अधिकाऱ्यांसोबत गेले अनेक वर्ष संपर्क साधून टेंडर मध्ये बदल करण्याची विनंती केली. त्यानुसारआता Budget CFS Terminal L.td या कंपनीने यशस्वी बोली लावल्यानंतर.कंपनी व्यवस्थापणाने कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्याशी संपर्क साधला.कामगार व कंत्राटदार यांच्याबरोबर चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर दोघांनीही सी डब्ल्यू सी कंपनी यशस्वी चालवण्यासाठी व डी.नोड ला पूर्वीचे दिवस आणून पुन्हा हजारो प्रकल्पग्रस्तांचा बुडालेला रोजगार मिळवून देऊन या सी.एफ.एस मध्ये प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळवून देणारे दिवंगत लोकनेते. दि. बा पाटील साहेबांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहण्यासाठी काम करणार असे ठरले. त्यानुसार कंपनी चालली पाहिजे कंपनीतील काम सुरळीत चालले पाहिजे अश्या तत्वाने एक करार कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या उपस्थित मार्गदर्शना खाली पार पडला. यावेळी NMGKS संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील, कंपनी व्यवस्थापण व कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.या झालेल्या करारामुळे बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्यामुळे बेरोगारांनी, ग्रामस्थांनी महेंद्र घरत यांचे आभार मानले आहेत. या करारामुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *