



लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथे 9 फेब्रुवारी ला जागरूक पालक, सुदृढ बालक मोहिमेअंतर्गत उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर,चे जेष्ठ संचालक विठ्ठलराव थिपे होते, उदघाटन उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे यांच्या हस्ते करण्यात आले, प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक अनिल काकडे , डॉ. संजय गाठे वैद्यकीय अधीक्षक ग्रामिण रुग्णालय गडचांदूर, डॉ. स्वप्नील टेंभे तालुका आरोग्य अधिकारी कोरपना /जीवती, श्री. गणेश जाधव ,बालविकास प्रकल्प अधिकारी कोरपना /जीवती उपस्थित होते, यावेळी RBSK टीम, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथील आरोग्य सहा. श्री. वाकडे उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे वतीने 9 फेब्रुवारी पासून संपूर्ण राज्यात जागरूक पालक,सुरक्षित बालक अभियान सुरु करण्यात आले आहेत, सदर अभियानात 0 ते 18 वयोगटातील सर्व बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे, अंगणवाडी मध्ये 0 ते 6 वयोगट तर शाळेमध्ये 6 ते 18 वयोगटातील मुलांच्या तपासणी करण्यात येणार आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ स्वप्नील टेम्भे यांनी दिली, अभियान यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले ,
कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते,
,