बेलदार समाजाचा राज्यस्तरीय विवाह सोहळा व उपवर – वधू परिचय मेळावा

by : Shankar Tadas

* २१ व २२ जानेवारी ला आयोजन
चंद्रपूर :
विदर्भ बेलदार व तत्सम समाज संघटना जिल्हा चंद्रपुर व शहर शाखेचे विद्यमाने १९ वे राज्य स्तरीय अधिवेशनात दोन जोडप्यांचे विवाह व उपवधु-वर परिचय मेळावा चंद्रपुरात आयोजीत करण्यात आला आहे.२१ व२२ जानेवारी रोजी चंद्रपुर-नागपूर मार्गांवरील शकुंतला फार्म/लाॅन येथे होणारे अधिवेशनात राजयभरातून ५००० चे वर समाजबांधव हजेरी लावणार आहे.
२१ जानेवारी ला पहिल्या सत्रात सकाळी 10.00 वाजता सामुहीक विवाह सोहळा  होणार आहे.दुसरे सत्रात सांस्कृतीक कार्यक्रम होईल.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभाताई चिलके व उदघाटन श्रीमती रजनी अनिल ठाकूरवार यांचे हस्ते होईल. याप्रसंगी आमदार प्रतिभाताई धानोरकर वरोरा ,वैशालीताई पुल्लावार यांची उपस्थिती राहील.
२२ तारखेला १९ वे  अधिवेशनाचे उदघाटन डाॅ.सुभाष रेड्डीवार मुल यांचे हस्ते होणार आहे.अध्यक्षस्थानी माजी आमदार वणी राहतील.प्रमुख मार्गदर्शक राजयिचे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहीर राहतील.
या प्रसंगी विदर्भ बेलदार व तत्सम समाजाचे प्रांतीय अध्यक्ष चंद्रशेखर कोटेवार, डाॅ.सुनिल कुल्दीवार, विजय मूत्यालवार,विजय ठाकुरवार, सागर ठाकुरवार, सुनिल संकुलवार , पंकज नन्नेवार ईतयादी नगर सेवक , अनिल बोरगमवार व प्रांतीय कार्यकारीणीचे समस्त पदाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत दूसरे सत्रात वधु-वर परिचय मेळावा व विविध भेटवस्तू ड्रा चे वितरणाने मेळावा संपन्न होईल. मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे
प्रांतीय पदाधिकारी आनंदराव अंगलवार, रविंद्र बडिवार चंद्रपुर प्रमोद एडलावार चंद्रपुर जिल्हा पदाधिकारी आनंद कार्लेकर मनिष कन्नमवार आरती अंकलवार मंगला बंडिवार ऋचा आडपेवार व शहर पदाधिकारी सचिन चलकलवार , पवन कन्नमवार अपर्णा अंगलवार,मनिषा कन्नमवार दिपाली बंडीवार इत्यादिनी एका पत्रकाद्वारे आवाहन करित आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *