*सण संक्रांतीचा विषय हळदीकुंकवाचा*****

 

लोकदर्शन कल्याण.-👉गुरुनाथ तिरपणकर

आपल्या महाराष्ट्रात बरेच सण हे वैशिष्ठ्य पूर्ण आहेत,त्यातीलच एक महत्वाचा सण मकरसंक्रांत.या दिनी सूर्य मकर राशी मध्ये प्रवेश करतो.जाने कधी 13,तर कधी 15 .ही असू शकते हिंदू पंचांग प्रमाणे पण शक्यतो बऱ्याचदा 14 तारखेस मकरसंक्रांतीचा सोहळा साजरा होत असताना आपण पाहत आलो .या सणाला भारतात उत्तरेकडील प्रदेशात मोकळ्या मैदानात किंवा बिल्डिंग च्या गच्ची वर लोक पतंग उडवून त्या योगे आकाशात छोटे दिवे कंदील द्वारे पतंगाच्या जोडीने सोडून दिव्यांच्या रोषणाईची मजा अनुभवतात.
तिळ हे नैसर्गिक तैलजन्य पदार्थ असून त्यातील तेलामुळे या दिवसात होणाऱ्या रुक्ष त्वचे चे स्नेहन व संरक्षण होते तर गुळ हा उष्णता निर्माण करणारा पदार्थ असून शरीरात उष्णता कायम टिकवतो.या वेळी सुरु असलेला हेमंत ऋतू मधील गारवा शरीराला व त्वचेला चुरचुरत असतो.नैसर्गिक रित्या शरीराचे बल वाढवून व पोषण होण्यासाठी तिळाची गुळपोळी यावेळेस आवर्जून अन्नसेवनात असते. व ते आरोग्यास लाभदायी ठरते.
तिळगुळ देण्याची प्रथा एव्हड्यासाठी च की तिळाचा स्नेह ,व गुळाचा गोडवा प्रत्येकाने आपल्या लल

वागण्या बोलण्यात जपावा एकमेकांनचा आदरभाव राखावा. बोलणे सौहार्दपूर्ण व सौजन्यशील असावे त्यात माधुर्य निर्माण व गोडव्याने नातेसम्बंध दृढ व्हावे हा एक उद्देश अधोरेखित आहे.पूर्वीच्या काळी महिलांना घरातील कामाच्या व्यापातून एकत्र येऊन सण साजरा करण्यासाठी महिला त्यानिमित्ते हळदीकुंकू एकमेकींना देऊन,मैत्रिणींमध्ये मिळून मिसळून भेटावयास मिळ६त असे.म्हणून या सणाला सर्व मान्यता लाभली.पण अजूनही आधुनिक युगात आपल्याला*तिळगुळ घ्या,अन गोडगोड बोला*हे सांगावे लागते,याचे मला वैषम्य वाटते.

मला वाटते संक्रांत सणाच्या दिवशी इतके गोडगोड बोलण्या पेक्षा रोजच संक्रांत सण समजून सर्वांच्या बरोबर सकारात्मक राहून कोणालाही न दुखवता ,कटुता न ठेवता गोड व चांगलेच बोलावे, सूर्याचे संक्रमण तर दर महिन्यास होत असते, मग तो मकर राशीत प्रवेश करतो तसा 12 महिने 12 राशीतून त्याचे संक्रमण सुरूच असते, व तो सर्वाना सारखीच ऊर्जा देत असतो तसे आपण ही 12 महिन्यांच्या 12 संक्रांती मनापासून समजून घेऊन प्रेमाने सर्वांशी गोड च बोलावे असे मला प्रकर्षाने जाणवते,सण आपणास हे बोधप्रद ज्ञान देतात ते सर्वोतोपरी उपयोगात आणावे, असे वाटते,!!

हळदीकुंकू लावण्याचा अधिकार सर्वच महिलांना आहे, जिथे कपाळ,भाळावर ते लावले जाते तिथे आज्ञा चक्राची पूजा केली जाते,अन सतविचारांनी कुंडलिनी जागृत केली जाते हे तर सर्वानाच उपयुक्त आहे,

ज्या महिलांना त्यांच्या पतीने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ,सर्व अडचणीत अविरत परिश्रमाने अंतापर्यंत साथ दिलेली आहे त्यांना पतीची प्रेमळ आठवण म्हणून तर त्यांनी हळदीकुंकू लावावेच असे मत मी येथे नमूद करू इच्छिते,

काही रूढी परंपरा, रीतिरिवाज जे त्याकाळी आवश्यक भासले ,त्यावर विचार मंथन करून काळाप्रमाणे त्यात बदल घडला पाहिजे, अन हे कार्य आता आपल्या सारख्या जेष्ठ अन श्रेष्ठ भगिनींनीअनुभवी महिलांनी जर बदल घडवले तर कालानुरूप हळूहळू याचा विचार आताची पिढी करू लागेल ,असे जाणवते,

माझ्या मते कुंकू हे माहेरच व सासरचे पवित्र लेणे आहे. प्रत्येक स्त्री ने ते जीवनभर जपलं पाहिजे.सर्वच स्त्रियांनी आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग समजून सन्मान राखला पाहिजे.

प्रत्येकजण जेव्हढे भाग्य घेऊन जन्माला येतो, तेव्हढेच त्याला ते मिळत असते, त्यात महिलांचा कोणताही दोष नसतो,

केवळ नवरा असणे हेच मध्यवर्ती मानुन अशा महिलांचे महत्व ठरवणे हे उचित व योग्य नाही.समाजात अशा एकाकी एकटे असलेल्या महिलांनाच भावनिक गरज असते.सर्वानी त्यांची मनस्थिती समजून घेणे आवश्यक आहे.पुढील जीवनसंघर्ष ती एकटीच सांभाळत असते.तिला सन्मान पूर्वक जगण्याचे स्वातंत्र्य व अवकाश मोकळ्या मनाने द्यायला हवे.

पण कुठेतरी अन कोणीतरी सुरुवात करायलाच हवी तर हळूहळू का होईना आपसूकच महिला अंतर्मुख होऊन बदल स्वीकारण्यास सामोरे जातील व हे ही चित्र पालटेल असे मला वाटते,

या रूढी परंपरे विरुद्ध महिलांनीच संवेदना जाणून घेऊन प्रथम पाऊल उचलून पुढे सरकले पाहिजे,शेवटी हा तिच्या आत्मसन्मानाचाच ज्वलंत प्रश्न आहे, तो सोडविण्यास तिनेच निग्रहाने आग्रही राहून सार्वजनिक ठिकाणी जनजागृती केली पाहिजे असे मला प्रकर्षाने जाणवते👏

**सौ.मीना म.घोडविंदे.**
**समाज सेविका **
**सर्वांना गोड शुभेच्छा **

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *