सांस्कृतिक स्पर्धेत आसन खुर्द शाळा चॅम्पियन

by : Shankar Tadas

गडचांदूर :

आसन खुर्द येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन ठरत यश संपादन केले आहे.
सांस्कृतीक स्पर्धेत एकूण सहा प्रकार घेण्यात आले.त्यापैकी आसन खुर्द शाळेने सहा पैकी चार प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली.
त्यापैकी प्रथम क्रमांक- फॅन्सीड्रेस स्पर्धा,
प्रथम क्रमांक – समूहगायन स्पर्धा, प्रथम क्रमांक – वैयक्तिक नृत्य स्पर्धा,
प्रथम क्रमांक – नक्कल,
सांस्कृतीक स्पर्धेसोबतच क्रिडा स्पर्धेतही प्राथमिक गट
कबड्डी मुली – व्दितीय क्रमांक,
रिले रेस – व्दितीय क्रमांक,
लांब उडी- प्रथम क्रमांक,
माध्यमिक गट,
कबड्डी मुली – प्रथम क्रमांक,
400 मीटर मुले – व्दितीय क्रमांक,
400 मीटर मुली – व्दितीय क्रमांक,
थाळी फेक मुली – प्रथम क्रमांक,
लांब उडी मुले – प्रथम क्रमांक,
लांब उडी मुली – व्दितीय क्रमांक पटकावत यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षक श्री. तुकाराम धंदरे यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे गडचांदुर बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी मा. सचिनकुमार मालवी, केंद्रप्रमुख मा. पंढरी मुसळे, शा. व्य.स.चे अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी,मुख्याध्यापक श्री. मारोती सोयाम,शिक्षिका सौ. हर्षदा शेंडे व ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आसन खुर्द शाळेच्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here