कोरपना पोलिस स्टेशनमध्ये रक्तदान शिबीर

By : Shankar Tadas
कोरपना : राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त कोरपना पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन 12 जानेवारी रोजी करण्यात आले. ब्रदर्स ऑन ड्युटी कोरपना, बेस्ट फ्रेंड्स हेल्प वेलफेअर सोसायटी, आदिलाबाद, रिम्स हॉस्पिटल, आदीलाबाद तसेच रामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम, चंद्रपूर यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 48 नागरिकानी रक्तदान केले.
याप्रसंगी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम, चंद्रपूरचे सदस्य तसेच ‘लोकदर्शन’ पोर्टलचे संपादक शंकर तडस यांनी माहिती दिली. प्रमुख अतिथी कोरपनाचे ठाणेदार सदाशिव ढाकणे, मांडवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. तरोने मॅडम, रिम्सचे डॉक्टर यांचा सत्कार ब्रदर्स ऑन ड्युटीच्या वतीने दिनेश राठोड यांनी केला.  कोरपना पोलिसांनी यावेळी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here