इन्फंट कॉन्व्हेंट येथे शिक्षक – पालक सभेचे आयोजन.


लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट् जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल येथे शिक्षक – पालक सभा पार पडली. या प्रसंगी शिक्षक – पालक सभेचे अध्यक्ष मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, उपाध्यक्ष उद्धव राठोड, सचिव संतोष सागर, सचिव श्वेता भटारकर, सहसचिव सुभाष मरसकोल्हे यासह पालक वर्ग उपस्थित होते.
याप्रसंगी शिक्षक पालक यांनी संयुक्तपणे शालेय उपक्रमाबाबत चर्चा केली, येणाऱ्या सत्रात घ्यावयाच्या विविध उपक्रमाबाबत माहितीचे आदानप्रदान केले, पालकांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू यांनी केले सूत्रसंचालन श्वेता भटारकर यांनी तर आभार प्रदर्शन दिपक खाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here