ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे रविवारी सकाळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या
हस्ते धानोऱ्याचे नवनिर्वाचित सरपंच विजय आगरे, सदस्य विनोद खेवले, गुलाब पोडे, वंदना जुनघरे, ममिता गौरकार यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धानोरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी विजय आगरे तर सदस्य पदी विनोद खेवले, गुलाब पोडे, ममिता गौरकार, वंदना जुनघरे हे निवडून आले. त्याअनुषंगाने नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला व ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या नवीन वर्षाची दिनदर्शिका भेट देण्यात आली.

यावेळी यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, मन की बात कार्यक्रमाचे संयोजक संजय तिवारी, धानोऱ्याचे सरपंच विजय आगरे, अमोल थेरे, मानस सिंग, धानोरा ग्रामपंचायत सदस्य विनोद खेवले, ममता गौरकार, उत्तम आमडे, गुलाब पोडे, वंदना जुनघरे, प्रवीण सोदारी, नितीन काळे, वमशी महाकाली, रज्जाक शेख, डग्गा असोसिएशनचे अध्यक्ष संतोषसिंग चंदेल, विलास भगत, प्रभाकर डांगे, सुरेश जोगी, चंदू थिपे, राकेश येटावार, मोरेश्वर उलमाले, राजू भरणे, महेंद्र जेणेकर, राहूल बोबडे, अनिकेत कविटकर, आकाश सोनटक्के, सुरज रासपल्ले, विनोद राजूरकर, महेश गदामवार, मारोती खोब्रागडे, स्वप्नील दुर्गे, रवीकांत नांदे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here