



लोकदर्शन वालुर 👉महादेव गिरी
वालुर येथील जि.प.कन्या शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.राणी मसुरे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे ,सरपंच संजय साडेगावकर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्या निमित्ताने गावातील उच्च शिक्षीत गिता नारायण आष्टकर,प्राजक्ता वाल्मिक हारकळ यांचा सत्कार करण्यात आला.सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने महिलांसाठी शाळेच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, या स्पर्धेतील विजेत्या महिलांना गजानन साडी च्या वतीने सौ.छाया घनवट व रंजना सोनवणे यांना पैठणी भेट दिल्या.यावेळी मनोगत व्यक्त करतांना जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांनी उपस्थित महिलांना बाल विवाह होऊ देणार नाहीत ,तसेच स्त्री भ्रुनहत्या होऊ देणार नाहीत अशी शपथ दिली. तसेच सरपंच संजय साडेगावकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी उपसरपंच गणेश मुंढे, पांडुरंग रोकडे,लिंबाजी कलाल, सतिष कलाल,धारूजी धाबे, रामराव बोडखे,दादामिया कुरेशी, हमिदखाँ पठाण व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन षडानन देशमाने यांनी केले तर आभार गोविंद रोकडे यांनी मानले