



लोकदर्शन वालुर 👉 महादेव गिरी
वालुर येथील माळीगल्ली येथील श्रीसंत सावता महाराज मंगल कार्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागेश साडेगावकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिन आरे,राजेश साडेगावकर उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित बहुसंख्य शालेय विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिन आरे,राजेश साडेगावकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचारीत्र्यावर आपल्या मनोगतातुन प्रकाश टाकला. कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष नागेश साडेगावकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोपाळ थोरात यांनी केले तर आभार शंकर गोंधळकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठि सिताराम बगले, गणेश घाटुळ, सावता हारकळ, विशाल सोनवणे, शिवाजी सोनवणे, रामा हारकळ, विष्णु कटारे, योगेश जीवणे, वैभव थोरवटे, कुणाला घाटुळ, अंगद सोनवणे, मामा जवळकर, राऊत, सखाराम पाथरकर आदिंनी परीश्रम घेतले.