नगर पंचायत नियोजन शून्य गैर व्यवहाराची चौकशी करा. गीता अशोक डोहे गट नेता न.प.कोरपना ♦️(पालक मंत्र्याकडून दखल ३० दिवसात अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्याना निर्देश)

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

चंद्रपूर जिल्ह्यातील एक हाती सत्ता व एकाच कुटुंबातील हम करेसो कायदा यामुळे नगर पंचायत अनेक गैरव्यवहार व नियमबाह्य कामात चर्चेत असताना या नगर पंचायत मध्ये सत्त्ताधाऱ्याचा एकच मिशन,, ठेकेदार फक्त ,,भूषण,, हे गेल्या सात वर्षा पासून नियमबाह्य पदाधिकाऱ्याचा नातेवाईक व सत्ताधीश पदाधिकारी स्वत:लाभ मिळविण्यासाठी निविदा घोटाळा करीत वर्ग ५ मध्ये नोंदणी असताना व कामाची आर्थिक मर्यादा ५० लक्ष असताना कोट्यावधीचे कामे कोरपानातच नव्हे तर राजुरा विधानसभा क्षेत्रातील गोंडपिपरी,राजुरा,गडचांदूर येथे करतात कसे हा प्रश्न निर्माण झाला असून घन कचरा व्यवस्थापन कामात मोठा गैर व्यवहार व मजुराचे शोषण केल्याच्या तक्रारी आहेत.नुकत्याच न्यायालयाने गोंडपिपरी येथील शोषणाचा भुर्दंड नगरपंचायती फटकार बसताच गैर व्यवहार चव्हाट्यावर आला अशा प्रकार सर्वत्र आहे.कोरपना येथे भूषण यांचे सर्वच कामे निकृष्ट असून २ वर्षातच अनेक सिमेंट कॉक्रेट रस्ते उखडू लागले एवढेच नव्हे तर वैशिष्ट्य पूर्ण निधी अंतर्गत सन २०१७-१८ मध्ये शासनाचे प्रशासकीय मान्यता व वितरण आदेशानुसार मंजूर बांधकाम सुरूच केले नसताना निधी २०२१ मध्ये पूर्ण खर्च झाला मात्र १३ कामापैकी १) वार्ड क्र.२ साईपंप ते भगत यांच्या घराकडील १५ लक्ष मुथा लेआउट मधील बालउद्यान वार्ड क्र.१६ बळवंत ठाकूर ते रणदिवे सिमेंट रस्ता १) ज्येष्ठ नागरिक विसावा तसेच बालोध्यान हि कामे झाली नसतांना व अपूर्ण कामे असताना निधी खर्च झाला कसा. तसेच वार्ड क्र.४ मध्ये विजय भगत ते कावडकर यांच्या घराकडे जाणारा रस्ता दुसऱ्या निधीतून बांधकाम झाले तेच काम यामध्ये समाविष्ठ कसे. हा निधी गेला कुठे मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांनी पत्र क्र.७३६ दि.१०/०९/२०२० ला भूषण इटनकर संदर्भ २७ मार्च २०१८ नगर विकास शासन निर्णय नमूद करीत खुलासा मागितला असतांना हा निधी गेला कुठे या बाबत अंकेक्षण अहवालात अनेक गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले.नगर पंचायत मध्ये मोठा गैर व्यवहार फोफावल्याच्या अनेक तक्रारी असताना जिल्हा प्रशासन अधिकारी या कडे दुर्लक्ष करीत गैर व्याव्हारला खत पाणी घालीत असल्याने चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वन,मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीरभाऊ मूनगंटीवार यांचे कडे कोरपना नगर पंचायतीच्या भोंगळ कारभारावर व निकृष्ट कामे निविदा घोटाळ्याचे पुराव्यानिशी निवेदन देऊन मागणी केली यावर पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांना तत्काळ ३० दिवसाच्या आत चौकशी करून अहवाल मागणी केल्याने नगर पंचायत वर्तुळात खळबळ माजली आहे. वार्ड क्र२मध्ये सर्वसांडपाणी बालोद्यान क्षेत्रात घाण जमा होऊन नागरीकाच्या आरोग्याचा धोका वाढला आहे तर बालकासाठी खेळणी साहीत्यनिकृष्ठ बसवून अदांजपत्रकाप्रमाणे साहीत्य लावले नाही हा प्रकार वार्ड क्र१मध्ये सुद्धा घडला आहे कंत्राटदाराच्या कामाबाबत अनेक प्रश्न निर्माण होत असून कागदावर भुषण मात्र प्रत्यक्ष कामावर ठेकेदार कोन याचे दर्शन गावकऱ्याना घडत नाही पदाधिकारीच्या लगतचे मित्रच घडपड करत असतात असे चित्र आहे नगरसेवक गीता डोहे, किशोर बावणे,वर्षा लांडगे,सविता तुमराम,शुभाष हरबडे,आशा झाडे यांनी नगर पंचायत नियोजन शून्य व गैर व्यवहाराचे चौकशीची मागणी केली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *