नोगराजजी मंगरूळकर सर यांच्या *वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडाचांदुर २६ ऑक्टोंबर , २०२२ राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रातील निष्ठावंत आणि प्रामाणिक नेतृत्व असलेले आदरणीय नोगराजजी मंगरूळकर यांचा आज 66 वा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन.
कोणत्याही पदाला प्रामाणिक न्याय देण्यासाठी सदैव झटणारे मंगरूळकर सर यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडिलांचे संस्कार स्वीकारून सामाजिक बांधिलकीचे व्रत त्यांनी जोपासले. शिक्षकी पेशातून त्यांनी ज्ञानदानाची प्रामाणिक सेवा दिली तसेच सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी केलेले शैक्षणिक कार्य मोलाचे ठरले.सरांची सामाजिक सेवेसाठी सदैव कार्यतत्पर व तत्त्वनिष्ठ वृत्ती प्रेरणादायी आहे . गावातील सामाजिक संस्कृती व सलोखा ठेवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मृदु आणि संयमी स्वभाव हे त्यांच्या आयुष्याची पुंजी आहे असे ते मानतात असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले आमचे मार्गदर्शक माननीय नोगराजजी मंगरूळकर यांना वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो आणि त्यांचे आरोग्य सुदृढ निरामय राहो अशी ईश्वरचरणी अभिलाषा व्यक्त करतो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here